स्थैर्य, फलटण, दि. १८ : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवार (दि.१८) रोजी जाहीर झाला. दरम्यान, या ९० ग्रामपंचतींमधील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजेगटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मा.श्रीमंत संजीवराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे की, मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघात साकारलेल्या हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीमुळे मतदारसंघातील जनतेने आमच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे. आज या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी येथील “सरोज व्हिला” व “जय व्हिला” या निवासस्थानी येवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व मा.आ.दिपकराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेतले.
या मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळेच काशीदवाडी, ढवळेवाडी (निं.), वाघोशी, रावडी खुर्द, डोंबाळवाडी, तडवळे, तडवळे (सं.वाघोली) या ग्रामपंचायतीत बिनविरोध सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले. तद्नंतर झालेल्या निवडणुकीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व राजेगटाची सत्ता प्रस्थापित झालेल्या ग्रामपंचायती अनुक्रमे पुढीलप्रमाणे : कोळकी, हिंगणगाव, गुणवरे, सरडे, राजुरी, जाधववाडी (फ.), मुंजवडी, फडतरवाडी, ढवळ, सांगवी, सस्तेवाडी, पवारवाडी, खामगाव, जावली, काळज, होळ, वडगाव, जाधववाडी (तां.), कुरवली बुद्रुक, नाईकबोमवाडी, हणमंतवाडी, शिंदेनगर, मुरुम, साठे, शेरेचीवाडी (ढ.), मलवडी, घाडगेमळा, नांदल, मुळीकवाडी, वडजल, कोऱ्हाळे, ठाकुरकी, झिरपवाडी, निंभोरे, खराडेवाडी, कोरेगाव, कापडगाव, आरडगाव, रावडी बुद्रुक, भिलकटी, कापशी, मिरढे, सोनगाव, धुळदेव, अलगुडेवाडी, टाकळवाडे, कांबळेश्वर, तावडी, खुंटे, सासकल, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, सोनवडी बुद्रुक, आंदरुड, सोनवडी खुर्द, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, शेरेशिंदेवाडी, पिराचीवाडी, बोडकेवाडी, निरगुडी, जिंती या फलटण तालुक्यातील तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन, फडतरवाडी, दहिगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, चौधरवाडी, नांदवळ, सोळशी अशा एकूण ७८ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली आहे.