आम्ही श्रीमंत रामराजेंच्या सोबतच; फलटण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 03 जुलै 2023 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जो निर्णय घेतील त्यांच्यासोबतच फलटणची राष्रवाडी काँग्रेस पार्टी राहील; असा विश्वास फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी स्पष्ट केला.

विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जो निर्णय घेतील; त्यांच्या सोबत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व जनता असेल, असेही नेवसे यांनी स्पष्ट केले.

काल, दि. ०२ रोजी उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आहे. तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबतच फलटण राष्ट्रवादी खंबीरपणे आहे; असेही नेवसे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!