
दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आज दुपारी साताऱ्यात आगमन झाले. यावेळी सर्किट हाऊस परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
शरद पवार यांच्या दौऱ्यात पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. ते
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार अजित पवार आणि वळसे-पाटील सातारा मध्ये आले आहेत. यावेळी त्यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,पालक मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे,आमदार मकरंद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर थोड्याच वेळात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक येथे सुरु झाली.
दरम्यान विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई हे बँकेच्या मुख्यालयातील बैठकीसाठी गेले. बँकेच्या कामकाजाबाबत आणि विविध विषयांबाबत या वेळच्या बैठकीत चर्चा झाली. सायंकाळी रयतची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सातारा शहरातील वाढेफाटा येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी पालक मंत्री बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील शशिकांत शिंदे आदींनी हजेरी लावली. शरद पवार व सर्वांचा मुक्काम सातारा येथेच असल्याने जिल्ह्यातील घडामोडी, किसन वीर कारखाना निवडणूक, आणि जिल्हापरिषद पंचायत समिती, पालिका निवडणुकीचा आढावा आणि जिल्ह्यातील राजकारणाबाबत सर्व प्रमुख नेतेमंडळी बरोबर शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे शक्यता वर्तविली जात आहे.