अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या रविवारी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती; “या” ठिकाणी संपन्न होणार


स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण येथील कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता या मुलाखतींना सुरुवात होईल, अशी माहिती शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी दिली.

यावेळी आमदार सचिन पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले तसेच पक्षाचे प्रदेश व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

खुद्द आमदार सचिन पाटील हेच राष्ट्रवादीच्या अधिकृत मुलाखत प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत असल्याने, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा बहुचर्चित प्रवेश नेमका लांबला आहे की थांबला आहे, यावरच आता फलटण शहरात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!