दैनिक स्थैर्य । दि. २३ जुन २०२२ । दापोली । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दापोली येथील कृषी विद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या वतीने बटालियन अधिकारी कर्नल जे. पी. सत्तीगिरी निर्देशानुसार राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्राला दापोली कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅडेट ज्ञानेश्वरी चाटे आणि कॅडेट वैष्णवी देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिबिर यशस्वीरित्या व्यवस्थापित झाले. सत्र इतके उत्साही होते की योग सत्र सुरू झाल्यानंतर माजी सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ. अरुण माने यांनी एनसीसी युनिटचे कौतुक करून एनसीसीकॅडेट्स ला प्रोत्साहित केले.
सर्व कॅडेट्सनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय करण्यासाठी सनब्लीस हॉटेलचे मालक तसेच कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन तोडणकर मोलाचे सहकार्य लाभले. एनसीसी युनिट, कृषी महाविद्यालय दापोलीच्या सर्व कॅडेट्सने मोलाचे सहकार्य केले.