‘एनसीसी रिपब्लिक डे कॅम्प २०२३’ संचालनात सहभागी एनसीसी कॅडेट ज्युनिअर अंडर ऑफीसर मयुरी शेवते हिचा कोळकी येथे सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
‘एनसीसी रिपब्लिक डे कॅम्प २०२३’ संचालनात देशात महाराष्ट्र एनसीसी निदेशालय सर्वश्रेष्ठ विजेता ठरून प्रधानमंत्री बॅनरचा मानकरी बनला. ११५ मुले-मुली असलेल्या या महाराष्ट्र एनसीसी कंटीजंटमध्ये कोळकी, ता. फलटण येथील माजी सैनिक सुनिल शेवते यांची कन्या एनसीसी कॅडेट ज्युनिअर अंडर ऑफिसर मयुरी सुनिल शेवते हिचाही सहभाग होता. मयुरीच्या या यशाबद्दल कोळकीच्या आजी-माजी सैनिक संघटनेने तिचे अभिनंदन करून सत्कार केला.

कोळकीच्या आजी-माजी सैनिक संघटना सभागृहात शनिवारी सायंकाळी ४ वाजता पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाजेगाव कर्नल्स अ‍ॅकॅडमीचे संचालक कर्नल जयवंतराव पाटणकर उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिक संघटना कोळकीच्या वतीने कर्नल जयवंतराव पाटणकर यांच्या हस्ते एनसीसी कॅडेट मयुरी शेवते हिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक राम खिलारे उपस्थित होते.

या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, माजी सैनिक सुनील शेवते, व कोळकीचे ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!