
स्थैर्य, मुंबई, 02 : अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ तस्करीचा अँगल समोर आल्याने हे प्रकरण एका धक्कादायक वळणावर गेले आहे. दरम्यान अंंमली पदार्थ तस्करी प्रकरणी NCB चे मुंबईमध्ये अटकसत्र सुरू झाले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याची शक्यत आहे. कारण या अटक झालेल्या दोघांशीही तर शौविकचे आणखी कनेक्शन उघडकीस आले आहे. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.
NCB कडून आतापर्यंत फक्त चौकशी सुरू होती मात्र आता याप्रकरणात जैद या ड्रग डीलरची पहिली अटक करण्यात आली. मंगळवारी एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला अटक करण्यात आली आहे. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. तो वांद्रे याठिकाणचा होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे NCB ला शंका आहे की रिया देखील शौविककडून अंमली पदार्थ घेत असावी. या घटनांनंतर रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे. जैदकडून 17 मार्च 2020 या दिवशी शौविकने अंमली पदार्थ घेतले होते, असे समोर आले आहे.
तर याच अंमली पदार्थ प्रकरणी NCBने आज पहाटे बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे. हा तोच बशीद आहे ज्याने जैदची ओळख शोविकशी करुन दिली होती. बशीद आणि शौविकचे खास संबंध असून शौविक, बशीद आणि जैद अशी तिघांची जोडी होती.
जैद हा बांद्राला राहत असून त्याचे पुर्ण नाव जैद विलात्रा आहे. NCB च्या हाती एक WhatsApp चॅट लागलंय ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. जैद सॅम्युअल मिरांडाच्या देखील संपर्कात होता. जैदचे बशीद आणि सुर्यदिप मल्होत्रा नावाच्या दोन तरुणांसोबत WhatsApp चॅट समोर आले आहे. सुर्यदिप देखील शौविकशी संपर्कात असलेल्यांपैकी एक आहे. 17 मार्च 2020 ला शौविकने सॅम्युअल मिरांडाला जैदचा नंबर दिला होता आणि सॅम्युअलला 5g बदल्यात 10 लाख रुपये देण्यास सांगितले होते.