एनसीबी अधिकाऱ्याचा दावा – अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्‍स पुरवायचा, आम्हाला इंटेलीजेंस एजेंसीकडून पक्के पुरावे मिळाले मुंबई 3 तासांपूर्वी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीत ड्रग्स पेडलर्सने बॉलिवूडच्या चार हिरोंची नावे घेतली आहे. यात शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरियाचा समावेश आहे. यात मोठी माहिती अशी हाती लागली की, अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करतो. आतापर्यंत फक्त अभिनेत्रींची नावे येत होती, आता अभिनेत्यांची नावे यायला लागली आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉलिवूडच्या मोठ्या हिरोंच्या नावाचा खुलासा केला आहे. अधिकाऱ्यासोबत झालेल्या बातचीतची पूर्ण रेकॉर्डिंग भास्करकडे उपलब्ध आहे. मागील दोन दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात हिरोदेखील असल्याची माहिती येत होती. पण, त्यांचे नावे न येता ‘A’, ‘D’ ‘R’ आणि ‘S’ अशी कोड नेम येत होती.

आता हे स्पष्ट झाले आहे की, A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डिनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहेत. अनसीबी अधिकाऱ्यांने सांगितले की, ट्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करायचा किंवा अजूनही करतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!