दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । बिबी । गेल्या चार दिवसांपासून बिबी ता. फलटण येथे नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे.
न्यू चैतन्य गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळ चौथाई वाडा बिबी या पूर्णपणे तयारी झाली आहे. डेकोरेशन साठी त्यांनी फुलांच्या माळा व लक्ष वेधून घेणार्या लाईटीच्या माळा यांचा वापर केला आहे.
न्यू चैतन्य गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळ चौथाई वाडा बिबी येथे मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटीमुळे नवरात्र उत्सवावर विरजण पडले होते. यावेळी दांडियाचेही नियोजन करण्यात आलं आहे.