
स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : रक्षक रयतेचा न्यूज आणि महिला मंच, फलटण यांच्या वतीने माळजाई मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महाभोंडला, दांडिया आणि विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाला महिलांचा विक्रमी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विविध उपक्रमांमुळे माळजाई मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.
गगनगिरी ज्वेलर्स, लायन्स क्लब, माळजाई मंदिर उद्यान समिती आणि नंदाज युनिक किचन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी ‘नवरंग नवरात्री फोटो स्पर्धा’ आणि ‘उपवासाचे पदार्थ’ यावर आधारित पाककला स्पर्धा घेण्यात आली होती. पाककला स्पर्धेत सौ. शीतल विखे पाटील यांनी प्रथम, सौ. अश्विनी कदम यांनी द्वितीय, तर सौ. राजश्री गुळवणी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून सौ. प्रिया धुमाळ आणि सौ. वनिता जगदाळे यांनी काम पाहिले.
यासोबतच, सौ. रेवती गोसावी, सौ. सारिका गुजर आणि सौ. भाग्यश्री क्षीरसागर यांनी घेतलेल्या महाभोंडला कार्यक्रमाला आणि मोफत दांडियालाही महिलांनी मोठी गर्दी केली होती. नवरंग फोटो स्पर्धेतील सर्व सहभागी महिलांना गगनगिरी ज्वेलर्सच्या सौ. मोनाली रविराज शहाणे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, केबी उद्योग समूहाचे प्रमुख सचिन यादव व सौ. सुजाता यादव, लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, गगनगिरी ज्वेलर्सचे रविराज शहाणे, उद्योजक भोजराज नाईक निंबाळकर, माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रक्षक रयतेचा इव्हेंट टीमच्या सौ. असिफा शिकलगार, सौ. रूपाली कचरे, सौ. नंदा बोराटे, सौ. निता दोशी, सौ. मनीषा घडिया, सौ. प्रियांका सस्ते, सौ. सुवर्णा शिंदे, सौ. अनुराधा रणवरे, सौ. उज्वला गोरे यांच्यासह ‘रक्षक रयतेचा न्यूज’चे संपादक नसीर शिकलगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.