
स्थैर्य, अमरावती, दि. 14 : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोव्हिड 19 वरच्या उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात येतंय. गेले 7 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
नवनीत राणा यांच्यावर सुरुवातीला घरीच क्वारंटाईन करून उपचार करण्यात येत होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
मुंबईला आणण्यासाठी विमानाची व्यवस्था न झाल्याने त्या रस्तामार्गे मुंबईला येत आहेत. राणा कुटुंबातल्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.