‘नव मत शिक्षण’ हे समता नाकारणाऱ्या शैक्षणिक धोरणाचा पर्दापाश करणारे पुस्तक – डॉ. प्रा. आण्णासाहेब होवाळे


 

स्थैर्य, सातारा दि 24 : केंद्राची नवी शिक्षा निती  ही सक्षम अर्थार्जन साठी कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार करते हे जरी भविष्य वेधी रास्त असले तरी घटनात्मक अधिकाराचे वंचितांचे समतेचे शिक्षणाचे दुर्लक्षित करण्यात आल्याची चिकित्सक मांडणी ‘नम मत शिक्षण’ हे पुस्तक आहे.  नवे शैक्षणिक धोरण अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे उदगार डॉ  प्रा.  आण्णासाहेब होवाळे यांनी काढले.  

बहुजन भगीरथ डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्यां जयंतीदिनी त्यांच्या समाधी स्थळी अभिवादन नंतर जेष्ठ पत्रकार व परिवर्तनवादी कार्यकर्ते प्रा. शिवाजी राऊत लिखित ‘  नव मत शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन निमित्त अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते.

 

या वेळी कॉ. अस्लम तडसरकर म्हणाले, नवे शिक्षण धोरण हे शिक्षण क्षेत्रात सतत अभ्यासले गेले पाहिजे त्यातील अनेक बाबी स्विकारल्या असल्या तरी त्या येथे लागू करताना घटनात्मक शिक्षण बाजूला सारून काही केले जाणार नाही ना हे ही तपासले पाहिजे. त्यासाठी  शिक्षण अभ्यासक प्रा शिवाजी राऊत यांनी लिहलेले नव मत शिक्षण हे अंतरंग स्पष्ट करण्यास उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो असेही  त्यांनी सांगितले.

पुस्तकाचे लेखक प्रा. शिवाजी राऊत  म्हणाले की,  नवे शिक्षण धोरण हे प्रारूप जरी चांगले असले तरी त्यात अनेक सनातनी हेतू ग्रहित धरून रचना केली आहे.  व्यवसाय प्रशिक्षण ते शाळाची वर्ग वारी विषयांची स्वतंत्रता मूल्यमापन करणाऱ्या बाह्य एनर्जी,  खाजगी करणं या अनेक वाद ग्रस्त छुप्या हेतुवर प्रकाश टाकण्याचा  प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. गणेश दुबळे यांनी सूत्र संचलन केले तर प्रा. विक्रांत पवार यांनी  सत्यशोधक कर्मवीरांना   एक कार्यकर्ता शिक्षक नव्या शैक्षणिक धोरणा वरील कर्मवीर जयंती दिनी अभिवादन  करून पुस्तक अर्पण करतो हे अनोखे अभिवादन ठरले आहे. 

 उपस्थितांचे स्वागत दीपक भुजबळ यांनी चाफा फुले व  पुस्तक प्रत भेट देवून केले.शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रबोधनात्मक मांडणी करणारे प्रा. शिवाजी राऊत यांच्या लेखणीतून बहुजन समाजाला दिशा मिळत आहे असे मत वाचकांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!