सातारकरांच्या पाणीटंचाईवर निसर्गची कृपा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 05 : सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावात निसर्ग चक्रीवादळाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला दोन दिवस झोडपून काढले असले तरी दुसरीकडे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव मात्र या दोन दिवसाच्या संततधार पावसाने सुखावला आहे.

या कास तलावाची पाणीपातळी सुमारे अडीच फुटाने वाढल्याने सातारकरांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका झाली आहे सध्या सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो .यापैकी कास तलाव हा सर्वात जुना पाणीपुरवठा करणारा पर्याय आहे .सुमारे 25 फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या या तलावातून शहराला दररोज साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा होतो .उन्हाळ्यामुळे मागील आठवड्यात या तलावाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती मंगळवारी तर या तलावात सात फूट 10 इंच इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. मात्र बुधवारपासून सुरु झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने पाणीसाठ्यात तब्बल दोन फुटांनी वाढ झाली असून आता साठा दहा फुटावर पोचला आहे.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा पालिकेने 21 मार्च पासून शहरात पाणीकपात सुरू केली होती. अशा परिस्थितीत कास तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा तालुक्यात येणारा मान्सून 15 ते 20 जून दरम्यान दर वर्षी येतो या वर्षी जर तो लांबणीवर गेला तरीही अजून सातारकरांना पुढील महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा तलावात उपलब्ध आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!