श्रीमंत रामराजेंनी केले ना. अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 10 सप्टेंबर 2023 | शिरवळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे – पाटील, मिलिंद नेवसे, दत्तोपंत शिंदे, डी. के. पवार, संजय पालकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची आज सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर येथे जाहीर सभा आहे. या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार पुणे येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होत असताना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच शिरवळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व सातारा जिल्ह्याच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.

राज्यामध्ये बदलेल्या राजकीय परिस्थिती नंतर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे पहिल्यांदाच सातारा मार्गे जात आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट संपूर्ण ताकतीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे स्वागत करत शेकडो गाड्यांचा ताफा कोल्हापूरकडे मार्गस्थ झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!