
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोशिएशन, सातारा यांच्या वतीने 32 व्या राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो क्रीडा स्पर्धा-2022 चे आयोजन दि. 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडसोली मैदान, फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
या क्रीडा स्पर्धेकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रु. 10 लाख, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी प्रत्येकी 5 लाख असे एकूण 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देशातील एकूण 24 राज्यांचे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक तसेच संघटना पदाधिकारी मान्यवर सहभागी झाले आहेत.