आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय वेबिनार संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मेढा, दि. ०३ : कोरोना -19  या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी असताना  गुरूवार दिनांक 25 जून, 2020 रोजी शैक्षणिक वर्ष (2020-2021) साठी जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा ता.जावळी जि. सातारा व शिवाजी युनिव्हर्सिटी इकोनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेबिनार अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाले. सुरवातीला या  वेबीनारमध्ये डॉ. संजय धोंडे  यांनी सहर्ष स्वागत केले.या वेबिनारचे आयोजक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य ,डॉ. प्रमोद घाटगे यांनी या वेबिनारच्या प्रास्ताविकात कॉलेजची स्थापना, संस्थेची भूमिका व हा  वेबिनार घेण्याबाबतचा मुख्य उद्देश त्यांनी स्पष्ट केला. त्यानंतर या राष्ट्रीय वेबिनार प्रथम सत्राचे पुष्प गुंफताना  साधन व्यक्ती म्हणून  सुयेक माजी अध्यक्ष  प्रा.सुभाष दगडे यांनी  या राष्ट्रीय वेबिनारच्या माध्यमातून covid-19 चा कृषी क्षेत्रावर  कसा परिणाम होत आहे यासंदर्भात स्पष्ट विचार मांडले.

दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून  डॉ. काशिनाथ तनंगे (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिग्लज)  यांनी द्वितीय सत्रात मांडणी करताना जागतिक पातळीवर कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली भयावह स्थिती आकडेवारीच्या माध्यमातून मांडली व त्याचे विपरीत परिणाम म्हणून सामाजिक व आर्थिक व्यवस्था कशी मातीमोल होत आहे व त्यावर केली जाणारी उपाय योजना याबाबतची विस्तृत भाष्य केले.

या राष्ट्रीय वेबिनारचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अनिल वावरे यांनी या दोन्ही रिसोर्स पर्सन यांनी केलेल्या मांडणीचे सार सांगून या प्रसंगी वेबिनारच्या उत्कृष्ट नियोजन व गुणवत्तेबाबत  समाधान व आनंद व्यक्त केला.तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय मत प्रतिपादन करताना covid-19 च्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा नसणे, शेतीमालाला योग्य हमीभाव नसणे, ऑनलाइन मार्केटिंगची कमतरता लोकांच्या सामाजिक व आरोग्यावर विपरीत परिणाम ,स्थलांतराचा प्रश्न, बेरोजगारीचा वाढता दर, तसेच ग्रामीण व शहरी संबंधात झालेले बिघाड या सर्व मुद्द्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व सरतेशेवटी सरकारची विकासात्मक हस्तक्षेपाचे आवश्यकता ग्रामीण अर्थव्यवस्थेला तारणारी आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.

         

सरतेशेवटी डॉ.सुजीत कसबे यांनी सुयेक आजी माजी अध्यक्ष ,कार्यकारी अध्यक्ष, सुयेक कार्यवाहक ,सर्व पदाधिकारी व सदस्यांचे व सहभागी  प्राध्यापक व विद्यार्थी  या सर्वांचे मनापासून आभार मानले.

हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी  जयवंत प्रतिष्ठान हुमगाव चे अध्यक्ष मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब तसेच संस्थेच्या सचिव मा. वैशालीताई शिंदे व विश्वस्त मा. अशोकराव नवले व  राहुलभाई जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच तांत्रिक सहाय्य डॉ. सुधीर नगरकर तसेच डॉ. ओंकार यादव प्रा. पी डी पाटिल तसेच पुण्याहून प्रीतम मॅडम व दुर्गा रायकर मॅडम आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मुस्तफा पठाण यांचे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय  वेबिनारमध्ये देशातून 524 प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. आयोजकांनी सदर ऑनलाईन वेबिनारचे यशस्वी व उत्तम नियोजन केले.त्यांचं सर्वा पातळीवर कौतुक होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!