१६ व १७ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘साहित्य संशोधन : दिशा आणि दृष्टीकोन’ राष्ट्रीय चर्चासत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक १६ व शनिवार दिनक १६ सप्टेंबर २०२२ रोजी मराठी विभाग व दैनिक सकाळ सातारा यांनी संयुक्तरित्या ‘साहित्य संशोधन : दिशा आणि
दृष्टीकोन ‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे .या चर्चासत्राचे उद्घाटन व बीजभाषण सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे हस्ते होणार  हे. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव ,प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर हे उपस्थित राहतील. शुक्रवारी सकाळी १२ वाजता ‘साहित्य संशोधनाचे स्वरूप आणि सद्यस्थिती‘या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.नंदकुमार मोरे हे शोधनिबंध वाचणार आहेत .दुपारी २ ते ३.३० या वेळेत मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ.अनिल सपकाळ हे ‘संशोधनाच्या पद्धतींचे स्वरूप व उपयोजन या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत.दुपारी ३.३० ते ५ या वेळेत साहित्य प्रकारनिष्ठ संशोधनाच्या दिशा या विषयावर गोवा राज्याच्या सरकारी कला ,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्नेहा महांबरे यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी ५ ते ते ६.३० या वेळेत साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्रे : अनुबंध या विषयावर कर्नाटक राज्यातील राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख शोध निबंध सादर करणार आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता अहमदनगर कोलेज अहमदनगर येथील मराठी अभ्यास संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.सुधाकर शेलार हे ‘पद्वीय प्रबंधलेखन ‘प्रक्रिया व पद्धती ’ या विषयावर
आपली मांडणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मराठी भाषा व शैक्षणिक समन्वयक प्रा.प्रमोद पवार हे ‘संशोधन साधने आणि आधुनिक तंत्रज्ञान : स्वरूप व उपयोजन ‘या विषयावर शोध निबंध सादर करणार आहेत. ‘दुपारी २ ते २.३० या वेळेत ‘शोधनिबंधाचे लेखन आणि प्रकाशन ‘या विषयावर संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा.ता.नांदेडचे मराठी विषयाचे प्राध्यापक व अक्षर वाड्मय या नियतकालिकाचे संपादक प्रा.डॉ.नानासाहेब सूर्यवंशी हे शोध निबंध सादर करणार आहेत. तर समारोप सत्रात मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.वंदना महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने केले असून मराठी
विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे व दैनिक सकाळ साताराचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी संयोजन केले आहे .समन्वयक म्हणून प्रा.संजयकुमार सरगडे व प्रा.प्रियांका कुंभार हे काम पाहत आहेत. मराठी विभागातील डॉ.कांचन नलावडे,डॉ.विद्या नावडकर, मराठी विभागातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी व दैनिक सकाळचे सर्वजण चर्चासत्र चांगले होण्यासाठी प्रयत्न करीत आहे .मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी या चर्चासत्रास संशोधक विद्यार्थी ,मार्गदर्शक,व प्राध्यापक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!