साताऱ्यात १६ व १७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विज्ञान परिषद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । सातारा । सामाजिक जाणीव जागृती च्या भूमिकेतून भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व किसन वीर महाविद्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय विज्ञान परिषद होणार आहे, याची माहिती किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर विलास खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रकांत खंडाईत, बोलताना पुढे म्हणाले की, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा व माणसाच्या जगण्याचा व जीवनाचा विचार विज्ञानवादी वावा नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक बुद्धी सुधारणावाद मानवतावाद विकसित करणे या हेतूने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या विज्ञान परिषदेमध्ये ग्रंथ प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन व जादूगाराचे चमत्कारा मागचे विज्ञान अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

या परिषदेचे उद्घाटन मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आ ह साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर जयवंत चौधरी ज्येष्ठ पत्रकार व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत या सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील भूषविणार आहेत उद्घाटन सत्रात नवीन शैक्षणिक धोरण व वैज्ञानिक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला जाणार आहे दुपारी साडेबारा वाजता दुसरे सत्र सुरू होणार असून यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे स्वामी विवेकानंद यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाष्य करणार आहे .यावेळी शिवाजी विद्यापीठातील शिक्षण शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विद्यानंद खंडागळे उपस्थित राहणार असून ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत . दुपारी अडीचच्या तिसऱ्या सत्रामधील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर अनिमेष चव्हाण हे अंधश्रद्धेचे मानसशास्त्र व उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शिवाजी विद्यापीठाची माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांचे प्रमुख उपस्थित असून या सत्राचे अध्यक्षस्थान छत्रपती शिवाजी कॉलेज चे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गणेश लोखंडे भूषणवणार आहेत . सायंकाळी चार वाजता मंगला नारळीकर या वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासक्रमाची आवश्‍यकता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत .

बुधवार दिनांक 17 ऑगस्ट सकाळी दहाच्या सत्रात संशोधनात्मक निबंध सादर केले जाणार आहेत . श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर हे भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धांचे उत्पत्ती या विषयावर मार्गदर्शन करतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर सतीश फरांदे शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्राध्यापक अभय जायभाये यांची प्रमुख उपस्थिती आहे आठव्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे चार्वाक ते संत गाडगेबाबा यांनी केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह या विषयावर भाष्य करणार आहेत नवव्या सत्रांमध्ये अडीच वाजता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक शाम मानव यांची प्रकट मुलाखत आकाशवाणीचे निवेदक सचिन प्रभुणे पत्रकार अरुण जावळे घेणार आहेत. चार वाजता राष्ट्रीय विज्ञान परिषदेचा समारोप होणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन श्याम मानव करणार आहेत यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती आहे या सत्राचे अध्यक्ष अधिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती राष्ट्रीय मधुकर कांबळे हे समारोपाच्या अध्यक्षस्थानी आहेत . एकविसावे शतक व वैज्ञानिक दृष्टीकोन ,अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, जादूटोणाविरोधी कायदा, ग्रामीण लोकांमधील अंधश्रद्धा कारणे व उपाय, अंधश्रद्धा मागील मानस शास्त्र, साहित्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरील शोधनिबंध 11 ऑगस्ट2022 पर्यंत पाठवायचे आहेत प्रबंधाची शब्दमर्यादा पंधराशे ते दोन हजार असावी . निवडक प्रबंधांना रोख बक्षीसे व स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!