राष्ट्रीय पोषण माह अभियान सावंतवाडीमध्ये संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | बारामती |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती-२ बिट शिर्सुफळ २ अंतर्गत बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायत गोजुबावी अंतर्गत सावंतवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये ‘राष्ट्रीय पोषण माह अभियान’ कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व विविध उपक्रमांची जनजागृती करणेकामी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचे उद्घाटन अभिमान माने (बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बारामती) यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी डी. ए. नवले (सहा. बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, बारामती), राजश्री सावंत (केंद्र प्रमुख, पंचायत समिती, बारामती), सुप्रिया माकर (पर्यवेक्षिका बीट शिर्सुफळ-१ व २), आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माता – पालक, शिर्सुफळ बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, सावंतवाडी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२३ जनजागृती कार्यक्रमामध्ये पोषण आहाराचे पाककृती व प्रात्यक्षिकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आहार प्रात्यक्षिक याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच समाजामध्ये आरोग्य व पोषण विषयक जागृती निर्माण करणे, पोषण विषयक सुधारणा करणे व संवेदनशीलता वाढविणे, शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरडधान्य उपयुक्त, आहारमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. आहाराची पध्दत चुकीची असलयास वेगवेगळ्या व्याधी / आजार निर्माण होतात, आदींबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला अंगणवडी सावंतवाडी केंद्रातील सेविका समिंद्रा सावंत, मदतनीस अंजना जाधव व शिर्सूफळ २ बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!