दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । फलटण । येथील मुधोजी हायस्कुल व जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितावर आधारित प्रश्नमंजुषा, गणितीय रांगोळी, गणित विषयक गाणी, बडबडगीते, वक्तृत्त्व स्पर्धा, गणितोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल आवड निर्माण होईल, असे मत मुधोजी हायस्कुलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी व्यक्त केले.
यावेळी मुधोजी हायस्कुल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गंगावणे, उपमुख्याध्यापक ननावरे, पर्यवेक्षक गोडसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांची मराठी व इंग्लिश भाषांमधून भाषणे झाली. कु. किसवे प्रिया हिने इंग्लिश मधून केलेले भाषण सर्वांनाच आवडले. कु. पखाले दिशा, कु. शिंदे तनिष्का, ढमाळ शिवतेज, गाढवे शुभम व शिक्षक श्री. शिंदे यांनी रामानुजन यांचे गणिता बद्दल चे विचार व्यक्त केले.
माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी विनोदी शैलीतून जीवनात गणिताचे महत्व पटवून देताना सांगितले की जीवनाचे गणित सुटायचे असेल तर गणित आले पाहिजे. श्री. पवार यांनी प्रास्तविक केले तर श्री. आटपाडकर सुत्रसंचालन व श्री. जाधव आभार व्यक्त केले.