१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदीअंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!