
दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे धेाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या लोक अदालतीत धनादेश न वाटलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाचे प्रकरणे इत्यादी सर्व प्रकारणांचा समावेश आहे. येत्या लोकदालतीमध्ये न्यायाधीश, पॅनल विधीज्ञ, सरकारी वकील, इत्यादी तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी सर्व पक्षकरांनी जास्तीत जास्त संख्येने संबंधित न्यायालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती नि. जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले आहे.