दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । तरडगाव येथे फलटण एज्यु केशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय,फलटण यांच्या वतीने फलटण तालुक्यातील तरडगाव गावात राष्ट्रीय किसान दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तरडगाव येथील राष्ट्रीय किसान दिन उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग जे किसान नेता म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किसान दिन असा साजरा केला याविषयी कृषिदूतांनी विध्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलिमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्नील लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत गणेश पवार ,ओंकार रांधवन ,पंकज सरक ,महेश शिंदे ,मानस शिंदे ,अजिंक्य सूळ ,शुभम वायसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.