राष्ट्रीय खो खो सामन्यांचा आज समारोप; श्रीमंत रामराजे यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटलांची उपस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो सामन्यांचा समारोप समारंभ आज दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. समारोप सोहळ्यासोबतच बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलावर राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

बक्षीस वितरण व समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, क्रीडा व युवक संचनालयाचे आयुक्त सुभाष दिवसे, साताराचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची उपस्थिती लाभणार आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, विजयराव बोरावके, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील माने, भारतीय खो – खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, भारतीय खो – खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांची विशेष उपस्थिती सदरील समारंभासाठी लाभणार आहे.

तरी सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!