दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
फलटण राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज शहरात स्वच्छता अभियान सुरू करून डास निर्मूलनासाठी फवारणी करावी यासाठी नगर परिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यातच फलटण शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच काही ठिकाणी स्वच्छता, साफसफाईची कामे वेळेवर झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात मच्छर वाढले आहेत. त्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे. त्यासाठी स्वच्छता अभियान चालू करून फवारणी करावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊन वरील समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी नगर परिषद अधिकार्यांना निवेदन देताना फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पंकज पवार, तालुका कार्याध्यक्ष श्री. अमिरभाई शेख, जिल्हा अनुसूचित जाती सेलचे उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष श्री. ताजुद्दिन बागवान, शहराध्यक्ष श्री. अल्ताफभाई शेख उपस्थित होते.