
स्थैर्य, औंध, दि.२२: भारताचे मा. पंतप्रधान स्व राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय काँग्रेस व हरणाई सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष ,खटाव -माण चे नेते रणजितसिह देशमुख यांच्या वतीने खटाव व माण तालुक्यातील कोविड सेंटरला सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रातिनिधीक स्वरूपात मायणी येथील कोविड सेंटरला सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले .या वेळी मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक व अध्यक्ष डॉ एम आर देशमुख , उपाध्यक्ष दीपक देशमुख , संजीव साळुंखे, शंकर माळी जावेद शेख, मारुती पवार ,व इतर कर्मचारी उपस्थित होते .
या वेळी डॉ देशमुख म्हणाले की रणजितसिह देशमुख हे नेहमी गरजू आणि गरीब लोकांच्या पर्यंत पोहचत असतात .आतच आठ दिवसापूर्वी रमजान ईद च्या निमित्ताने खटाव व माण तालुख्यातील गरीब आणि गरजू मुस्लिम कुटुंबाना मदतीचा हात म्हणून गरजू किट (साहित्य) वाटले यामुळे ज्या मुस्लिम कुटुंबाला ईद साजरी करता येणार नव्हती ते रणजित भैय्या यांनी केलेल्या मदतीमुळे करण्यास थोडी फार मदत झाली .आणि आज स्व राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्त कोविड रुग्णासाठी मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले .त्यांच्या या स्वभावामुळे खटाव माण मधील जनता त्यांच्यावर भरभरून प्रेम करते हे काय वेगळे सांगायला नको.
या वेळी संजीव साळुंखे म्हणाले की हा गुण आणि स्वभाव हा रक्तात असावा लागतो नाहीतर रणजित भय्यासाहेबा सारखे असे अनेक लोक प्रतिनिधी आहेतच की ज्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही , सरकारी काही मिळाले की त्याचा मोठा गाझा वाजा करायचा आणि मीच केले आसा आव आणायचा ,मात्र स्वतः च्या खर्चातून मात्र जनतेसाठी एक ही रुपया खर्च करायचा नाही . आशी ही रीत आहे.
काँग्रेस पक्ष हा नेहमी जनतेच्या आणि देशाच्या हिताचे काम करीत असतो.त्यातच गांधी घराण्याचे देशसाठीचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही .आज जो डिजीटल भारत आहे ते फक्त स्व.राजीव गांधी यांच्या मुळेच त्यांनी भविष्याचा विचार करून भारत देश संगणिकृत करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्ण केले आजचा जो भारत आहे तो .इतर देशांच्या तुलनेत आपला देश कुठेच कमी नाही ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच शक्य झाले .
शंकर माळी म्हणाले की खटाव आणि माण मध्ये रणजितसिह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोमाने काम करून गावो गावी काँग्रेस पक्षाची फळी उभा करू व ज्या ज्या वेळेस जनतेला आमची गरज असेल त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या साठी आशा कामाच्या मदतीने धावून जाऊ. आभार दीपक देशमुख यांनी मानले.