महाशिवरात्रीनिमित्त नटराज मंदिरात नटराज पाचू पिंडिस अभिषेक

रविवारी दि.15 फेब्रुवारी रोजी शास्त्रीय गायन सेवा, भरतनाट्यम, रात्री 10 ते सोमवार दि. 16 फेब्रुवारी सकाळी 5 दरम्यान महाशिवरात्री जागरण कार्यक्रम


स्थैर्य, 14 फेब्रुवारी, सातारा :  श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात साजर्‍या होणार्‍या महाशिवरात्री निमित्त रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत एकादशी रुद्र जप , लघु रुद्र होऊन व पूर्णाहूती होणार असून यावेळी महामंगल आरती व कलश यात्रा संपन्न होऊन मंदिरातील श्री मुलनाथेश्वर पिंडिस कलश महाअभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर अलंकार, नैवेद्य आरती व प्रसाद वितरण होणार आहे .याच दिवशी रात्री आठ ते 11 या वेळेत कलश स्थापना,लघुरुद्र जप आणि श्री नटराज पाचू पिंडिस कलश अभिषेक संपन्न होणार आहे . महाशिवरात्रीनिमित्त मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे .
रविवारी दि.15 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते सोमवार दि. 16 फेब्रुवारी सकाळी पाच दरम्यान महाशिवरात्री जागरण कार्यक्रम संपन्न होणार असून हे सर्व कार्यक्रम श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट श्री नटराज महिला मंडळ व योगदान सत्संग यांच्या सौजन्याने संपन्न होणार आहेत.

रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी आठ ते बारा या वेळेत स्वरसाधना संगीत विद्यालय ,सातारा यांच्या कलाकारांची शास्त्रीय गायन सेवा संपन्न होऊन सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सातारा येथील नटराज नृत्यकलाशाला ग्रुपच्या गुरु सौ.आचल घोरपडे व शिष्यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. रात्री आठ ते दहा या वेळेत सुधांशु किरकिरे यांच्या नृत्यसाधना संस्थेच्या कलाकारांचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे .


Back to top button
Don`t copy text!