दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच नर्मदा परिक्रमा पूर्ण : सौ. कोठावळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पांचगणी, दि. 9 : तीव्र इच्छाशक्ती बाळगल्याने तुम्हाला नक्की यश मिळतेच. अशाच दुर्दम्य इच्छाक्तीच्या जोरावर वयाच्या 64 व्या वर्षी सहा महिन्यांची खड तर नर्मदा परिक्रमा मी पायी चालत पूर्ण करू शकले, याचा आनंद अवर्णनीय आहे, असे प्रतिपादन दि वाई अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालिका सौ. गीता उर्फ साधना कोठावळे यांनी व्यक्त केले.

गुजरात व मध्य प्रदेशमधील नर्मदा परिक्रमा पूर्ण करून सौ. गीता कोठावळे व त्यांचे नातेवाईक नुकतेच परतले. वाई अर्बन बँकेच्यावतीने बँकेच्या संचालिका सौ. अंजली शिवदे यांच्या हस्ते व बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सौ. कोठावळे यांचा गौरव करण्यात आला.

सौ. कोठावळे म्हणाल्या, नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची खूप दिवसांची माझी इच्छा होती. लॉकडाउन असूनही आम्ही अत्यंत परिश्रमाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मी अनेक वर्षांपूर्वी परिक्रमा करण्याचा निश्‍चय केला होता, तो आज पूर्ण झाला. ही साक्षात नर्मदा मैयाची कृपादृष्टी आहे, असे मी मानते.

संचालक प्रा. विष्णू खरे म्हणाले, ही परिक्रमा ओंकारेश्‍वर, अमरकंटक येथून सुरू होऊन 3600 किलोमीटरच्या अंतराने तेथेच संपते. ऋषीमुनींच्या काळापासून या नर्मदा परिक्रमेला महत्त्व आहे.   सौ. कोठावळे यांनी डिसेंबरमध्ये सुरुवात केली आणि जूनमध्ये परिक्रमा पूर्ण केली. या काळात त्यांनी अत्यंत खडतर कष्ट करून कुटुंबाची परवानगी घेऊन 3600 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला. त्यांची ही साधना वाईकरांसाठी कृष्णातीरी नर्मदा भेटीला येण्याइतकी पवित्र व महत्भाग्याची आहे.

बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, अ‍ॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अ‍ॅड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, सीए. किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल आदींनी सौ. कोठावळे यांना शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!