अखिल ब्राह्मण महासंघातर्फे नारीशक्ती पुरस्कार सोहळा


स्थैर्य, 14 मार्च, सातारा : अखिल ब्राहमण महासंघातर्फे रविवारी (दि. 15) दुपारी 4 वाजता येथील समर्थ सदनमध्ये मान्यवरांच्या हस्ते होणार्‍या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये ल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा प्रशस्तीपत्र व नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अखिल ब्राह्मण महासंघाच्या संयोजकांनी दिली. त्यामध्ये काटदरे बॅण्डसच्या दीपा काटदरे, सूत्रसंचालक वैदेही कुलकर्णी, सौंदर्यतज्ज्ञ स्वाती ओक यांच्यासह नू महिलांना गौरविण्यात येणार आहे.

सातारा शहरातील समस्त ब्राह्मण समाजाची शिखर संस्था अखिल ब्राहमण महासंघातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणान्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

जिल्हयातील विविध क्षेत्रातील महिलांना हा नारीशक्तीपुरस्कार देण्यात येतो. यावेळी दीपा काटदरे (काटदरे बॅण्ड), स्वाती ओक (सौंदर्य तज्ज्ञ), नीला पटवर्धन (वूलन वर्क), स्मिता पाठक (गोसंवर्धन), कल्याणी कुलकर्णी (पॅथॉलॉजी लॅब), डॉ. मृणालिनी जोशी (आयुर्वेदीक औषधे उत्पादक), मनीषा कुलकर्णी (मनीषा क्रिएशन), गौरी बोडस (कथक नृत्य), वैदेही कुलकर्णी (सूत्रसंचालन) या मान्यवर महिलांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समर्थ सदनमध्ये होणार्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राहमण महासंघांच्या संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!