
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सातारा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल ब्राह्मण महासंघातर्फे विविध क्षेत्रांत गौरवशाली कामगिरी करणार्या महिलांना ब्राह्मण गौरवडॉ. माधवी जोग नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.
विक्रमवीर गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी, अॅड. ज्योती दिवाकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माधवी जोग, सेंद्रिय शेतकरी अनुश्री फडके आणि आर्थिक सल्लागार अनन्या कुलकर्णी या महिलांचा सत्कार यानिमित्ताने केला जाणार आहे.
राजवाडा येथील महिला मंडळ सभागृहात रविवार, दि. 9 मार्च रोजी दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना कोल्हटकर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजिका वैशाली भट उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहवे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, उपाध्यक्ष अॅड. श्रीराम देव, सचिव भास्कर मेहेंदळे आणि खजिनदार महेश कुलकर्णी यांनी केले आहे.