दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । एकेकाळी जगातील बलाढ्य देशावर निर्भर असलेला भारत २०१४ नंतर आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोट्यवधी भारतीयांनी आशिर्वाद दिल्यानंतर देशाच्या विश्वासावर ते खरे उतरले आहेत.आता भारत जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो.जागतिक पातळीवर तसेच बाजारपेठेत भारताची प्रतिमा उंचावली आहे.जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या यादीत १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर भारताने झेप घेतली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले.
करोना महामारीच्या काळात देशाला आत्मनिर्भरतेचा मुलमंत्र देत त्याची प्रभावी अंमलबजावणी मोदी सरकारने केली.पुर्वी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेकडून कर्ज घेणारा भारत आज या देशाला १५ लाख कोटींचे कर्ज देणारा देश बनला आहे.करोना महामारीच्या काळात देशाने लसीकरणासाठीची एक दिशा अवघ्या जगाला दाखवली. यशस्वी लसचा शोध घेवून या जागतिक महामारीतून जगाला मोठा दिलासा भारताने दिला.आज भारत पीपीई किट बनवणारा जगातील दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे.
करोना पुर्वी देशात बाहेरून पीपीई किट आयात केल्या जायच्या. देश आता संरक्षण क्षेत्रात ही वेगाने धावत आहे.स्वदेशी बनावटीचे हत्यारे भारत ८३ देशांना देत आहे. विविध तंत्रज्ञान,हत्यार, बंदुकी, क्षेपणास्त्रांची निर्मिती भारत करीत आहे. हेच खऱ्या आत्मनिर्भरतेचे द्योतक असल्याचे मत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.पंरतु, कॉंग्रेसच्या काळात आत्मनिर्भरतेऐवजी निर्भरतेवर भर देण्यात आला होता.निर्यातीच्या तूलनेत आयाताचे प्रमाणच अधिक होते.यामुळे होणारी वित्तीय तुटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत होता, असा टोला पाटील यांनी लगावला.