नंदकुमार खटके यांचे निधन


दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। गोखळी । खटकेवस्ती (गोखळी) येथील नंदकुमार गजानन खटके (55) यांचे आकस्मित निधन झाले..

त्यांच्या पश्चात वडील,आई, चुलते, चुलती, भाऊ, बहिण, भावजय सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष गजानन खटके यांचे बंधू व आकाश नंदकुमार खटके यांचे वडील होत. सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे, शेती आणि शेतकर्‍यांशी नाळ जपणारे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. यांच्या आकस्मित जाण्याने खटकेवस्ती, गोखळी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये फलटण बारामती इंदापूर दौंड, शिरूर, माळशिरस परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार, धार्मिक, राजकीय, वैद्यकीय आदी क्षेत्रांतील आप्तेष्ट मित्रपरिवार नातेवाईक सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!