दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । बारामती । जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर सर्व सामान्य कुटूंबातून येऊन सुद्धा यश मिळवल्यावर जमिनीवर राहून व शिस्त, कर्तव्य बजावत सेवा केल्याने नंदकिशोर पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी केले.
बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ अजित शिंदे बोलत होते या प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अभिनेते संजय खापरे, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रविता सालपे, नगरविकास चे सहसचिव जयसिंगराव पाटील, नानासाहेब पाटील, पत्नी सौ प्रिया पाटील, मुले श्लोक व ईशान पाटील व सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी मान्यवर उपस्तित होते. नंदकिशोर पाटील यांनी 37 वर्षाच्या सेवेमध्ये परिवहन खात्याची मान उंचावेल अशी कामगिरी केली असल्याचे डॉ अजित शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सेवा निवृत्ती नंतरच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकार्याची सेवेमध्ये मदत व कुटूंबियांची साथ व आई वडिलांचे आशीर्वाद या मुळे उत्कृष्ट सेवा करू शकलो त्यामुळे समाधानाने निवृत्त होत असल्याचे नंदकिशोर पाटील यांनी सांगितले
या प्रसंगी शाहूवाडी कोल्हापूर, ठाणे, मुंबई आदी परिसरातील मित्र परिवार, नातेवाईक, सेवा निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
सेवा निवृत्ती बदल परिवहन कार्यालय परिसरात पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले