अतिवृष्टी बाधितांना दिला नानासो इवरे यांनी दिलासा


दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। फलटण । पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सुचनेनूसार तालुकाप्रमुख नानासो इवरे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या दौर्‍यात सहभागी होवुन नागरीकाना दिलासा दिला.

अतिवृष्टीने फलटण शहर व परिसरात हाहाकार माजवला होता. नदी, ओढे नाले, तलाव भरुन मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील हजारो घरात पाणी शिरले. शेकडो प्राणी पाण्याने बाधित झाले. तालुका जलमय झाला.

दरम्यान, आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी ज्योती आंबेकर, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अवकाळीची तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत अवकाळीचा दौर्‍याचे नियोजन करण्यात आले.

या दौर्‍यात आमदार सचिन पाटील यांच्यासह तालुका शिवसेना प्रमुख नानासो इवरे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय गावोगावी जावून लोकांचे मनोबल वाढवून त्यांना दिलासा दिला. बाधितांना तातडीची मदत जागेवरच मिळवून दिली. अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर, तर बाधिताच्या घरात जाऊन पाहणी केली.

पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुध्दा नानासो इवरे यांच्या संपर्कात होते. याबाबतची माहिती त्यांनीही घेऊन तात्काळ मदत करण्याची सूचना अधिकार्‍यांना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!