नाना पटोलेंचे वक्तव्य हे वैफल्यग्रस्तातुन : जयकुमार शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । फलटण । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. त्यांना टीव्ही पुढे दिसायची सवय लागलेली दिसत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी निवेदनात व्यक्त केले.

नाना पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत ते पक्षाला शोभनिय नाही काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, व नेते यांना हि गोष्ट आवडली नसेल कोणत्याही सुसंस्कृत कार्यकर्त्यांना ही बाब रुजणारी नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील जनता याबाबत नाना पटोले यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे सारखा आहे ज्या पंतप्रधानांची जगाने दखल घेतली आहे. अशा लोकांवर बोलणे म्हणजे समाजामध्ये काँग्रेस पक्षाची राहिलेली प्रतिमा सुद्धा खराब करणे आहे हे कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी लवकरच समजून घेणे गरजेचे आहे. अशा वक्तव्याचा आम्ही जाहीर पूर्वक निषेध करतो व राज्य शासनाने अशा बेताल वक्तव्याची दखल घ्यावी तसेच मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा जयकुमार शिंदे यांनी दिला.


Back to top button
Don`t copy text!