नाना पटोले ची सत्तेची मस्ती उतरवणार : भाजपा चा इशारा; शहर भाजप कार्यकारीणीची पोवई नाक्यावर निदर्शनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । सातारा । नाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नानांच्या फोटोला जोडे मारले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भा ज पा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले.

भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आम्ही सर्व भा ज पा कार्यकर्ते याचा निषेध करतो.
यावेळी, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा चिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष अप्पा कदम, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैशाली टंकसाळे, प्रशांत जोशी, चिटणीस रवी आपटे, महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, ओ बी सी युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष मनीषा जाधव, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष प्रकाशकाका शहाणे, ओबीसी शहर उपाध्यक्ष अविनाश खार्शिकर, किरण माने, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!