नाना-नानी पार्कने सांगलीच्या वैभवात भर – खासदार शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सांगली जुन्या पिढीतील लोकांच्या विरंगुळ्यासाठी सांगली येथे तयार करण्यात आलेला नाना-नानी पार्क हा उत्कृष्ट प्रकल्प आहे. आर्थिकशैक्षणिकऔद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात सांगली शहर बदलत चालले आहे. नागरिकांना सन्मान मिळावा यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याची जबाबदारी महापालिकेची असते. महानगरपालिकेने नाना-नानी पार्क हा चांगला उपक्रम हाती घेतला. या प्रकल्पासाठी मदत केलेल्या लोकप्रतिनिधींचे आभार मानून हा पार्क सांगलीच्या वैभवात भर घालणारा आहेअसे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांनी केले.

रिलायन्स मॉल सांगली शेजारी उभारण्यात आलेल्या नाना-नानी पार्कचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलसहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटीलखासदार श्रीनिवास पाटीलमहापौर दिग्वीजय सुर्यवंशीआमदार विद्याताई चव्हाणमहानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीसजिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाजमहानगरपालिकेचे पदाधिकारीआजी व माजी नगरसेवकनागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविकात महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी नाना-नानी पार्क साठी अनेक लोकप्रतिनिधींनी मदत केल्याचे सांगून 1 कोटी 35 लाख रूपये खर्चून हा पार्क 27 गुंठे जागेत उभा केल्याचे सांगितले. तसेच या पार्कसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी बांधकाम व इतर कामासाठी 51 लाखखासदार वंदना चव्हाण यांनी हॉलच्या बांधकामासाठी 25 लाखआमदार जगन्नाथ शिंदे यांनी नरगोला व ट्रॅकसाठी 10 लाखआमदार विद्याताई चव्हाण यांनी ॲम्पी थिएटर व परगोलासाठी 10 लाखआमदार ख्वाजा बॅगसो यांनी लाईट व्यवस्थेसाठी 5 लाख रूपयांचा निधी दिला असून कंपौंड वॉलसाठी डी.पी.डी.सी. निधी 34 लाख रूपये दिला असल्याचे सांगितले.

दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । मुंबई ।या पार्कमध्ये बहुउद्देशीय हॉलउपासना केंद्रयोगासने व घ्यानधारणा केंद्रग्रंथालय व वाचनालयज्येष्ठ नागरिक विरूंगळा केंद्र अशा सोयीसुविंधा आहेत. यावेळी केपीटी मार्फत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ई-रिक्षासाठी मदत देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!