
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । बळीराजा आणि बैल , जनावरे यांचे अतूट नाते असते आणि या नात्यापायी बळिराजा काहीही दिव्य पार करण्यासाठी तयार होत असतो बैलाला आपले कुटुंबातला सदस्यच मानणारे अनेक जण आपण पाहिलेले आहेत कोरेगाव तालुक्यातील चंचळी जवळील घाडगेवाडी येथील नारायण नामदेव घाडगे बुवा ( वय ८५) हे शेतकरी असेच आहेत. त्यांनी आपला कुटुंबातला असलेला सदस्य म्हणून पोपट या बैला कडे बघितले आणि त्याच्या मृत्यूला वर्ष झाल्याच्या निमित्ताने चक्क बैल , शेतकरी , जगद्गुरू तुकोबाराय या अनुषंगाने किर्तनकार डॉ सुहास महाराज फडतरे ( कुमठे) यांचे *कीर्तन बुधवार दि ५ जानेवारी रोजी घाडगेवाडी येथे* ठेवले आहे. नारायण घाडगे बुवा यांनी सहा महिन्याचा खोंड १९९८ मध्ये घेतला होता. घाडगे कुटुंबीयांच्या मध्ये वडिलोपार्जित बैल पाळण्याचा छंद आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये त्यांनी नाव कमावले आहे. या खोंडा चे नाव त्यांनी पोपट असे ठेवले होते. वर्षभरापूर्वी पोपट हा बैल वारल्यानंतर त्यांनी त्या तो कुटुंबातील सदस्य म्हणून सावडण्याचा विधी तेरा वाघ भरणी असे विधी तर केलेच शिवाय यंदाच्या वर्षी प्रथम स्मृतिदिन सुद्धा साजरा करत आहेत पोपट हा त्यांच्या घरातला गुणी प्रेमळ असा सदस्य होता. मायाळूपणा त्याच्यात भरून पावला होता असे नामदेव बुवा घाडगे यांचे म्हणणे आहे.