
स्थैर्य, बारामती, दि. 28 ऑगस्ट : येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती नलिनी अंकुश जाधव (वय 80) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली ,जावई, नातवंड असा परिवार आहे. वीर सावरकर सिमस क्लबच्या संचालिका शर्मिष्ठा जाधव यांच्या त्या आई होत. त्यांचा सामाजिक कार्यात तसेच भजनी मंडळाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.