नाईकबोमवाडी एमआयडीसीद्वारे 20 हजार तरुणांच्या हाताला काम देणार

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती


दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। फलटण । माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीबाबत बैठक आयोजित केली होती. या एमआयडीसीत लवकरच मोठा उद्योग येणार असून तालुक्यातील 20 हजार बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, गेल्या 30 वर्षांत फलटणच्या राजकर्त्यांनी कोणताही विकास न केल्यामुळे फलटण तालुका विकासापासून मागे राहिला होता. तो बॅकलॉग भरून काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. लवकरच नाईकबोमवाडी एमआयडीसीचे भूमिपूजनहोणार आहे. याठिकाणी उद्योग सरू होण्यासाठी मोठ्या उद्योजकांशी बोलणे झाले आहे. त्यांना फलटण येथे उद्योग सुरु करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. याबाबतीत उद्योजकांनीही संमती दर्शवत लवकरच नाईकबोमवाडी येथे लवकरच मोठा उद्योग उभारणार असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील 20 हजार तरुण बेरोजगार व स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विविध प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला यांनाही मोठ्याप्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात बारामतीसारखा फलटणचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. नीरा-देवधर, धोम-बलकवडीचे बारमाही पाणी करणे हेही माझे ध्येय आहे.

या बैठकीस उद्योग मंत्रालय अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!