दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण | नाईकबोमवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व धनगर समाजाचे नेते माऊली कारंडे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक तुकाराम खुसपे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी सरपंच निवृत्ती खुसपे, बापुराव चव्हाण, संदीप कदम, अक्षय पिसाळ, दयानंद घाडगे, सुखदेव चव्हाण यांसारख्या प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. माऊली कारंडे यांच्या प्रवेशामुळे नाईकबोमवाडी व परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
कारंडे यांच्या प्रवेशामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता वाढली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला चांगली दिशा मिळेल आणि जनतेने दिलेल्या मताचा आधार घेऊन तालुका दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न केले जातील.
नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. गावातील कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकत देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.