स्थैर्य, कोरेगांव, दि.२५: इवलेंसें रोप लाविलें द्वारी। त्याचा वेलु गेला गगनावरीं।।*
श्री ज्ञानदेवांच्या वरील अभंगात साधनेचे रूप आपल्या जीवनात कसे बदलत जाते याचे अत्यंत सुरेख वर्णन करण्यात आलेले आहे. माऊली म्हणत आहेत, मोगऱ्याचे छोटेसे दाराबाहेर लावलेले रोप म्हणजेच साधनेची सुरुवात बघता बघता वाढत गगनावरी पोहोचले आहे
अगदी असाच वेलू नागझरी ता.कोरेगाव येथे सन १९७७ साली वारकरी सांप्रदायच्या अनेक माऊलींनी एकत्र येऊन लावला आणि आपल्या गावात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु झाला.बघता बघता ४४ वर्षे संपली. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोरोनारारख्या भीषण महामारीत पारायण रद्द झाला. मात्र नव्या पिढीच्या माऊलींनी हा पारायण सोहळा डिजीटल करण्याची संकल्पना समोर आणली. ७ दिवस सलग पणे सायंकाळी ६ ते ९ असा दररोज ३ तास प्रवचन/व्याख्यानांचा मेळा झुम व्दारे हजारो ग्रामस्थांना अनुभवता आला. नागझरी पारायण सोहळा जगभरात थेट दिसत होता,यासाठी नागझरीचे उदयोजक थेट थायलंडहून टेक्निकल मदत करणारे दॊलत भोसले व सुजाता भोसले यांनी मोलाची मदत केली. एकाचवेळी ग्रामस्थांनी या Online पारायण सोहळयाचा आनंद लुटला. प्रवचनकार व व्याख्याते संदिप दिक्षीत महाराज,रमेश आप्पा भोसले,सुजाता दॊलत भोसले, विकास भोसले पत्रकार, माधुरी घाडगे-काळभोर , उपप्राचार्य मोहन भोसले,प्रा.रविंद्र भोसले यांनी मॊलीक मार्गदर्शन केले . नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आता माऊलीचे पारायण सोहळे सुध्दा डिजीटल झाले आहेत.असे सोहळे इतर गावत सुध्दा व्हावेत.