सासकल येथे नागपंचमी उत्साहात साजरी : नागपंचमीची दीडशे वर्षापूर्वीची परंपरा कायम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । फलटण । नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.फलटण तालुक्यातील सासकल या गावी दीडशे वर्षापूर्वीपासून नागपंचमीची परंपरा असून सर्वजण भक्तिभावाने हा सण साजरा करतात. गावातील दळवी कुटुंबीय शेतातील काळी माती आणून दोन दिवस आधी चिखलापासून नागदेवतीची मूर्ती तयार करतात.हे काम पूर्वी धोंडीबा दळवी यांनी अनेक वर्षे केले.त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे चिरंजीव दत्तात्रय दळवी हे परंपरा चालवत आहेत.त्या चिखलाच्या नागदेवतेला डाळ, गव्हाच्या खपल्या, करडई लावून सजवले जाते.सुरवातीला वाड्यातील महिला पूजा करतात मग मिरवणूक निघते.नैवद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या,गव्हाचे धिरडे,दूध याचा वापर करतात.संध्याकाळी पाच नंतर गावातील जेष्ठ महिला,पुरुष व मुले या मिरवणकीत सहभागी होतात.माहेरवाशीण महिला यात सहभागी होतात. पारंपारिक गाणी, नाच गाणी,झिम्मा फुगडी, गात पुढे निघून जातात.शेवटी उत्तरपूजेनंतर पाण्यात विसर्जन केले जाते.आज दिडशे वर्षांपासून दळवी कुटुंबीय ही परंपरा जपली आहे.


Back to top button
Don`t copy text!