सर्वांगीण गुणवत्ता विकासात नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 8 अग्रेसर

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत


दैनिक स्थैर्य । 5 मे 2025। फलटण । सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण आकर्षक शालेय इमारत, सुसज्ज वर्ग खोल्या, बोलक्या भिंती व निसर्ग रम्य शालेय परिसर लाभलेली फलटण शहरातील नगर परिषद प्रा. शाळा क्रमांक 8 या शाळेने स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धेतही आपली चुणूक दाखवून वेगळा ठसा उमटवला आहे.
या शाळेला कमिन्स इंडिया फौंडेशन मार्फत 75 इंची डिजिटल इंटरॅक्टिव बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरा, 32 इंची दोन स्मार्ट टीव्ही, कंपाउंड वॉल, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज, शाळेसमोरील आवारात पेवर ब्लॉक, वर्ग खोल्या व व्हरांड्यातील फरशी बदलणे, दरवाजे व खिडक्या बसविणे, किचन शेड दुरुस्ती, मुले/मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी सर्व वर्ग खोल्या रंगविणे, इ – लर्निंग साहित्य संच, खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांसाठी स्वेटर, संगणक संच, स्मार्ट टीव्ही, वर्ग खोली दुरुस्ती इत्यादी बाबी करुन दिल्या आहेत, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. इंदुबाई पावणे यांच्याकडून शाळेत संगणक संच, प्रिंटर, साऊंड, वॉटर फिल्टर इत्यादी मदत झाली आहे.
त्यामुळे खाजगी शाळांमध्ये असणार्‍या सर्व सोयी सुविधा नगर परिषद शाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळे शाळेने क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे व शाळेची पटसंख्या वाढीस मदत झाली आहे.
सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षात मुख्याधिकारी निखिल मोरे, उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शाळेने आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक तसेच सांघिक खेळांमध्ये जनरल चॅम्पियनशिप पटकावली. सांस्कृतिक कार्यक्रमात देखील आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षात बाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे यामध्ये… 1) संस्कार जगताप – मंथन 150 पैकी 144 गुण मिळवून राज्यात 4 था, आयएएस 150 पैकी 132 गुण मिळवून जिल्ह्यात 4 था, आयटीएसइ 200 पैकी 194 गुण मिळवून राज्यात 4 था, 2) आयुष भोई – मंथन 150 पैकी 142 गुण मिळवून राज्यात 4 था, 3) स्वरुप कारंडे – मंथन 150 पैकी 132 गुण मिळवून जिल्ह्यात 5 वा, आयएएस, 150 पैकी 132 गुण मिळवून जिल्ह्यात 4 था, 4) वेद काशीद – 150 पैकी 130 गुण मिळवून केंद्रात पहिला, 5) हर्ष कदम – मंथन 150 पैकी 136 गुण मिळवून जिल्ह्यात 3 रा, 6) शिवन्या चंदनशिव – मंथन 300 पैकी 290 गुण मिळवून राज्यात 6 वी, आयएएस 300 पैकी 282 गुण मिळवून राज्यात 6 वी, 7) अनमोल निकम – मंथन 300 पैकी 272 गुण मिळवून केंद्रात 5 वा, 8) माही क्षीरसागर – मंथन 300 पैकी 268 गुण मिळवून केंद्रात 7 वी, 9) शरण्या घोरपडे – मंथन 300 पैकी 258 गुण मिळवून केंद्रात 13 वी, आयएएस 300 पैकी 258 गुण मिळवून जिल्ह्यात 7 वी, 10) आर्शिया तांबोळी मंथन केंद्रात पहिली, 11) अर्णव थोरात – मंथन 300 पैकी 230 गुण मिळवून केंद्रात 25 वा. आला आहे.
यशस्वी विद्यार्थी, पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, वरिष्ठ लिपिक खाडे, बिआरसी समन्वयक सौ. कुंभार, मुख्याध्यापक दीपक पवार, मार्गदर्शक शिक्षक सौ. होळकर, श्रीमती निंबाळकर, गोडसे, खंकाळ, श्रीमती दांगट यांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!