विडणीत नाभिक समाजाच्यावतीने नागपंचमी उत्साहात साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । सालाबाद प्रमाणे परंपरे नुसार नागपंचमी सणाचा मान नाभिक समाजातील कर्वे व साळुंखे घराण्याला असून नागपंचमी सणासाठी नागदेवतेची मुर्ती करायला पंधरा दिवस माती भिजऊन तयारी सुरु करावी लागते. नाभिक समाजातील सर्वजण एकञ येऊन मुर्ती बनवत असतात या चिखलाच्या मातीला नागाचा आकार देऊन त्यावर खपली करडी डाळ ज्वारीच्या लाह्या असे कडधान्ये चिकटऊन नक्षीकाम करुन आकर्षक नागदेवतेची मुर्ती तयार केली जाते. भक्तीमय वातावरणात विडणीमध्ये नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला.

नागपंचमी दिवशी तिची विधीवत पूजा करुन वाजत गाजत गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदीरात आणली जाते.या ठिकाणी गावातील भाविक भक्त भक्तिभावाने दर्शन घेत असतात.सायंकाळी गावातील महिला वर्ग मंदीरात येऊन नागदेवतेची,सासर माहेरची गाणी म्हणून आपली मनातली गोष्टी हितगुज यातून आपल्या सखी मैञीणीकडे व्यक्त होत असतात.या बरोबर झिम्मा फुगडी पिंगा हुतुतु झोका सारखे खेळ देखील मोठ्या आवडीने खेळले जातात.

सायंकाळी सात वाजता मंदीरातून नागदेवतेची मुर्ती वाजत गाजत महिला नागदेवतेची भावपूर्ण गाणी गात गावानजिक असणाऱ्या निरा उजवा कालव्यात विधीवत पूजा आरती करुन नागदेवतेची मुर्तीचे विसर्जन केले जाते.यावेळी चिरमुरे शेगदाणे एकञ करुन प्रसाद वाटला जातो.


Back to top button
Don`t copy text!