स्थैर्य, मुंबई : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय आपण करत आहोत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे एन-95 मास्क परिधान करणे आवश्यक मानले जात होते. त्याच बरोबर भारत सरकारचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून एन-95 मास्क विषयी माहिती दिली आहे. नवीन सरकारी माहितीनुसार एन-95 मास्कचा वापर कोरोनाचा प्रसार रोखण्यात अयशस्वी ठरला आहे.
Director General of Health Services, Ministry of Health has written to all states and UTs stating, “the use of valved respirator N-95 masks is detrimental to the measures adopted for preventing spread of Coronavirus as it doesn’t prevent the virus from escaping out of the mask.” pic.twitter.com/TEA8BAqxzz
— ANI (@ANI) July 20, 2020