
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मुधोजी कॉलेजच्या ग्राउंडवरती एन.सी.सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण १०० कॅडेटची निवड करण्यात आली. मुधोजी महाविद्यालयात एकूण तीन एनसीसी युनिट असून फलटण तालुक्याबाहेरून विद्यार्थी एनसीसीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतात. एनसीसीची निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली जाते.
मंगळवार दिनांक ६/८/२०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ ची एनसीसी प्रथम वर्ष प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर पार पडली. या प्रक्रियेसाठी अत्यंत काटेकोरपणे परीक्षा घेऊन प्रथम वर्षासाठी १०० कॅडेटची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी बावीस महाराष्ट्र बटालियन, एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमन्नार सेना मेडल, अॅडम ऑफिसर कर्नल नागेंद्र पिल्लेई, सुभेदार मेजर तानाजी भिसे, ट्रेनिंग जेसीओ संभाजी शिंदे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. ज्ञानदेव देशमुख, वरीष्ठ व कनिष्ठ विभागाचा सर्व स्टाफ यांनी एन. सी. सी. प्रथम वर्षासाठी निवड झालेल्या सर्व कॅडेटचे तसेच प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कॅप्टन संतोष धुमाळ, केअरटेकर ज्योती काळेल व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.