माझे कुटुंब, माझी जबाबदारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची बीएमसीकडून आरोग्य तपासणी मुंबई2 तासांपूर्वी


 

स्थैर्य, दि.६: राज्यातील कोरोना महामारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.

बीएसीचे आरोग्य पथक वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी या आरोग्य पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली. यात त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!