
स्थैर्य, सातारा, दि.२९: जिल्ह्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. हा टप्पा 10 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शासकीय कर्मचारी हे घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. जेणे करून लवकरात लवकर लक्षणे असणाऱ्या बाधित रुग्णास वेळीच उपचार सुरु करुन मृत्यू दर कमी करता येईल. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या सेवकांना सहकार्य करावे. त्यानंतरही कोणाला कोरोना विषयक लक्षणे आढळल्यास किंवा तशी शंका आल्यास त्यांनी त्वरीत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना भेटण्याचे आवानही जिल्हाधिकारी यांनी केले.