
स्थैर्य, खटाव, दि.२१: कोरोनाच्या काळात शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ व ‘कोविड मुक्त महाराष्ट्र ‘ या मोहिमेचा शुभारंभ भुरकवडी ( ता.खटाव ) येथे खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, प्रशासक सरपंच एस.जी.शेजवळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस.के. कदम ( सर ), उपसरपंच सुखदेव जाधव, पत्रकार शरदराव कदम, सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, पोलीस पाटील किरण कदम, ग्रामसेविका धनश्री गंबरे, ग्रामसेवक सुर्यजीत देशमुख, सचिन सस्ते,आशा सेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनिषा चव्हाण, रंजना कुंभार यांची उपस्थिती होती.
यावेळी विस्तार अधिकारी श्री.शेजवळ म्हणाले की, गाव कोरोना मुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचा शुगर, बीपी, फुफ्फुस या आजाराविषयी व अन्य कोणतेही आजार आहेत का ? याचा सर्वे करण्यात येणार आहे. यासाठी त्या त्या भागातील स्थानिक स्वयंमसेवकांची गरज आहे. यासाठी मोठया संख्येने स्वयंमसेवकांनी या अभियानात सहभागी व्हावे. यानुसार भुरकवडीत ५० घरानुसार एक पथक याप्रमाणे सर्वे करण्यात येणार असून प्रशिक्षित एक पुरुष व एक स्त्री, स्वयंमसेवक हे काम करणार आहेत.